महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत दाभाडी

Gram Panchayat Dabhadi

गावाची माहिती

इतिहास

मालेगांव तालुक्यातील दाभाडी गावाची थोडक्यात माहिती :-
दाभाडी गाव हे गिरणा व दोधाडी नदीच्या काठावर बसलेले आहे. गावातील मूळ व्यवसाय हा शेती आहे. गाव त्यावेळेचा गिरणा सहकारी साखर कारखाना व गाव तालुक्या जवळ असल्यामुळे गावातील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होता. मात्र कालांतराने कारखाना बंद झाल्याने रोजगार प्रश्न निर्माण झाला.

2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांचे परिसीमन करण्यापूर्वी, दाभाडी हा 1977 ते 2004 दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचा मतदारसंघ क्रमांक 74 होता.

लोकसंख्या : २०११ जनगणना नुसार १७८३२ एवढी आहे.
एकूण क्षेत्रफळ : ३००९.५० हेक्टर
बागायती : ९२५.४० हेक्टर
जिरती : १४७५.८५ हेक्टर

शेती विषयक :
दाभाडी गावात पारंपारिक तसेच आधुनिक शेती केली जाते.

गावातील वार्ड : ०६

ग्राम पंचायत सदस्य माहिती :
एकूण सदस्य संख्या : १७
महिला सदस्य : ९
पुरुष सदस्य : ८

पिण्याच्या पाण्याचे स्रोत :
१२ गाव पाणी पुरवठा व वाढीव तळवाडे धरण योजनेतून गावाला नियमित पाणीपुरवठा केला जातो.

माहिती संख्या
घरांची संख्या 4656
दारिद्र्य रेषेखालील संख्या 886
जि. पं. शाळा 6
संस्था प्राथमिक शाळा -
माध्यमिक शाळा -
महाविद्यालय -
अंगणवाडी 25
मंदिरे 10 (रोकडोबा हनुमान मंदिर समाविष्ट)
मशीद 1
समजमंदिर 1
तलाव -
सोसायटी 1
ग्रामीण रुग्णालय दाभाडी 1
उपकेंद्र 2
राशन दुकान 6
पोस्ट ऑफिस 1
बँक 2